
दैनिक चालु वार्ता
कोरपना ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
राजूरा :- गडचांदूर कडे जाणार्या राज्यमार्गावर असलेल्या आर्यन कोल वाशरीज परिसरात मूत्यू पावलेल्या सहा जंगली डूकराला परस्पर गाडून विल्हेवाट लावण्याची धक्कादायक घटना समोर आली, असून या घटनेची वनविभागाला माहिती दिल्यानंतर तब्बल तिन दिवसानंतर खड्डा खोदून सहा डूकराना पोस्टमाटम साठी बाहेर काढण्यात आले आहे, या घटनेची चांगलीच खळबळ उडाली आहे, दरम्यान या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता जामीन मिळाली असल्याची माहिती देण्यात आली आहे,
गडचांदूर कडे जाणार्या राज्यमार्गावर असलेल्या आर्यन कोल वाशरीज असून बंद पडलेली वाशरीज सहा महिन्यांपूर्वी सूरू झाली आहे,
या वाशरीराजच्या परिसरात जंगली प्राण्यांचा नेहमीच वावर पाहायला मिळते, तिन दिवसा अगोदर मूत्यू पावलेल्या सहा जंगली डूकराची माहीती कोल वाशरीजने संबंधित वनविभागाला देणे अपेक्षित होते मात्र वाशरीज मधील सूरक्षा रक्षक दैलत लोणारे वय ४० वर्ष यांनी टाक्यालगतच्या पिसी १३० या पोकलन मशीनच्या मदतीने दहा फूटचा मोठा खड्डा खोदून सहाही डूकराची परस्पर विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रकार समोर आला या घटनेची माहिती लागताच पांढर पोवनी येथिल निवासी संदिप गायकवाड यांनी यांची माहिती वनविभागाला दिली, त्यांनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून तब्बल तिन दिवसानंतर सहाही डूकराना पोस्टमाटम साठी बाहेर काढण्यात आले व शहानिशा करण्यासाठी क्ष्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते घटना अंत्यंत गंभीर असून परिसरातील जनतेच्या अनेक तक्रारी असून त्यामुळे वनविभागाने संपूर्ण परिसर उकळून काढा जेनेकरून आनखी काही प्रकार समोर येईल यांची माहिती मिळताच या प्रकरणांची दखल घेऊन माजी वनमंत्री आमदार सूधीरभाऊ मूनगंटीवार यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यांवी अशी सूचना वन अधिकारी यांना दिल्या