
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कौठा सर्कल
एस.डी.बोटेवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील बाचोटी या गावचे सुपुत्र, भूमिपुत्र सीमा सुरक्षा दलाचे विर जवान बालाजी_श्रीराम_डूबुकवाड यांचे भारत मातेचे रक्षण करताना, आपले कर्तव्य बजावताना जम्मू काश्मीर (कुपवाडा) येथे विर मरण पत्कारले.भावी आमदार आदरणिय एकनाथ दादा पवार साहेब यांनी वीर जवान बालाजी श्रीराम डूबुकवाड यांच्या बाचोटी येथील घरी जावून सात्वन भेट दिली.या भेटीप्रसंगी वीर जवान बालाजी श्रीराम डूबुकवाड यांच्या पत्नी_आई_वडिलासह परिवाराला धीर दिला व त्याच्या दुःखात सहभागी झाले. सोबत बालाजी भैया परदेशी,मा. सैनिकसंघटना जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड, राम पाटील पवार, शरद भाऊ मुंडे, सुनिल पाटील हराळे, जगणराव धोंडगे.