
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
जोमेगाव:- मौजे जोमेगाव ता. लोहा जि.नांदेड येथे ल.पा. विभाग जि.प. नांदेड अंतर्गत पाझर तलाव असून गेल्या २० वर्षापासून या तलावाची कुठलीच दुरुस्ती केली गेली नाही. त्यामुळे सदरील तलावात बाबुळ बन झाले आहे. पिंचींग चे काम बाकी आहे व सांडव्याचे काम अपूर्ण असून पाणी लिकेज होत आहे. सदरील साठवण तलावाचे बांधावर व तळयात मोठे मोठे झाडे वाढले आहेत. त्यामुळे पाळुस धोका होण्याची शक्यता आहे.तरी मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी सदरील तलावाचे काम पूर्ण करून देण्यात यावे अशी विनंती भास्करराव पा. जोमेगावकर (सरचिटणीस:नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी) यांनी केली आहे.