
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
हातधुई :- शासकीय माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा हातधुई येथे 12 विच्या विद्यार्ध्याची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 27 रोजी घडली. या प्रकरणी शाळेच्या जबाबदार शिक्षकांवर तात्काळ कार्यवाही करून निलंबित करण्याचे लेखी आश्वासन सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस. एम. साबळे दिले आहे. धडगांव तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा हातधुई येथे 12वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या आकाश बावा तडवी वय 18 वर्षे रा.वरखेडी खु उतारपाडा या विद्यार्ध्याने शाळेच्या जवळच असलेल्या खोल घाटातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.सदरची घटना लक्षात आल्यावर येथील शिक्षकांनी पोलीस ठाण्याला माहिती कळविली व प्रेतला धडगांव ग्रामीण रुग्णालय नेऊन शवविच्छेदन करण्यात आले.
संबंधित शाळेचे शिक्षकांच्या त्रासामुळे विध्यार्ध्याने आत्महत्या केल्याचे सांगत व त्यांनीच आत्महतेच प्रवृत्त केल्याचे सांगत पालकांनी प्रेतला शाळेच्या कार्यालयात 7 ते 8 तास ठेवले. जो पर्यंत संबंधित जबाबदार शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत उचलणार नाही यावर ठाम राहिले. त्यानंतर आदिवासी विकास प्रकल्प तळोदा येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस. एम. साबळे.आल्यावर व त्यांनी संबंधित शिक्षकांची चौकशी करून निलंबनाची लेखी आश्वासन दिले.त्यानंतर पालक व ग्रामस्थांनी प्रेत उचलले.
मयत आकाश बावा तडवी यांचा मृत्यू झाला असून प्रकल्प कार्यालयाच्या वतीने दुःख व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही दुःखात सहभागी झालो असून सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत दोन लाख रुपयाची तातडीची मदत देण्याची कार्यवाही सुरु असून लवकरातच देण्यात येईल.सदर घटने बाबत समिती गठीत करून चौकशीचे आदेश देण्यात येत आहे.डॉ. मैनोक घोष. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा.