
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर तालुक्यातील चिंचपाडा व नवापूर शहरातील नवरंग रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम सोमवारी सकाळपासून सुरू करण्यात आले आहे या मार्गावरील वाहतूक 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी परिपत्रक देखील काढले आहे.या मार्गावरील पर्यायी वाहतूक धुळे ते गुजरात कडे जाणारी वाहने धुळे -साक्री – पिंपळनेर – नागपूर मार्गे गुजरात कडे व गुजरात राज्य कडून येणारी वाहने त्या मार्गाने धुळ्याकडे जातील तसेच गुजरात राज्याकडून नंदुरबार कडे येणारी वाहने गुजरात राज्यातून रेल्वे लेवेल क्रॉसिंग गेट क्रमांक 65 वरून उचल धानोरा मार्गे नंदुरबार धुळे व नंदुरबार कडून गुजरात कडे जाणारी वाहने त्याच मार्गे जातील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
रेल्वे गेट बंद असल्याने लाल बारीक कडून वाहने काढली जात आहेत या ठिकाणी पाण्याचे मोठे डबके असल्याने वाहने मार्गस्थ होणे जिकिरीचे होत आहे तसेच प्रवासी रिक्षा कार मोटर सायकल चिंचपाडा रेल्वे गेट बंद असल्याने चिंचपाडा रेल्वे गेट नजीकच रोडा खालून छोटी वाहने मार्गस्थ होताना वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. पहिल्या दिवशी महामार्गावरील वाहतूक बंद केल्याची सूचना ट्रक साल का पर्यंत न पोहोचल्याने वाहतुकीची कोंडी विसरवाडी व नवापूर शहरानजीक बघावयास मिळाले.