
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कळका ता. कंधार येथील जेष्ठ महिला कै. कोंड्याबाई धुराजी पा. गायकवाड यांचे आज दि. २९/१२/२०२१ बुधवारी रात्री वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय १२० वर्षे होते. तरी दि. २९/१२/२०२१ रोजी दुपारी ३ वाजता त्यांचा कळका ता. कंधार येथे अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या माघारी अंगदराव पा., माधवराव पा., मुली, सूना,नातू, पनतू असा मोठा परिवार आहे. सर्वानी अंत्यविधीसाठी यावे असे समस्त गावकरी मंडळी कळका ता. कंधार यांनी सांगितले आहे.