
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
✓ क्षमतेपेक्षा ऊसाची ट्रॅक्टर द्वारे वाहतूक
✓ ट्रॅक्टरवर टेप रेकॉर्डर साउंड बसून मोठ्या आवाजात गाणी लावल्याने चालकाला आजूबाजूचा अंदाज येईना
✓ पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
नांदेड :- नांदेड जिल्ह्यासह तालुक्यात ऊस उत्पादक हंगाम यंदा जोमाने सुरू झाले असून या हंगामाला गती देण्याचे काम वाहतूक करणारी वाहने देतात. मात्र ट्रक ट्रॅक्टर ट्रॉली यामुळे रस्ता सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या जवळून जाणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे ठरत आहे नांदेड जिल्ह्यातील व इतर साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होताच. दिवस रात्री ऊस वाहतूक करणारी वाहने शहरी भागासह ग्रामीण भागातील रस्त्यावर दिसून येत आहेत. त्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली व अलीकडे बैलाची कमतरता असल्याने ट्रॅक्टरला छकडी सारखी ऊस वाहतूक करणारी वाहने प्रामुख्याने दिसून लागली आहेत.
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी काठी तसेच कंधार तालुक्यात मन्याड नदी व लिंबोटी धरण व तालुक्यातील व जिल्यातील अन्य लहान मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून या भागात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून या भागातील उसाची वाढ ही चांगली असल्याने शेतकऱ्यांनी ऊस गाळपाकडे सध्या लक्ष केंद्रित केले आहे. मागील वर्षी व यावर्षी परतीच्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली असून ऊस पीक ही बहारदार आले आहे. त्यामुळे गाळप हंगाम जवळपास तीन ते चार महिने चालेल असा अंदाज शेतकर्यांतून व्यक्त केला जात आहे यंदा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी टोळ्यांसाठी लाखावर उचल ऊसतोड मजुरांना दिली आहे. विशेष म्हणजे यंदाचा ऊस तोडणीचा हंगाम ऐन दिवाळीत सुरू झाला असल्यामुळे बऱ्याच मालकांना टोळ्याची प्रतीक्षा करावी लागली होती. परंतु आता सर्व टोळ्या वाहन मालकाकडे आल्या असल्याने दररोज जेवढा जादा ऊस वाहतूक करता येईल तेवढा करण्याचा आटापिटा वाहन मालकाकडून होत असल्याचे चित्र दिसत आहे.
आजच्या परिस्थितीत ऊस वाहतूक करणारे वाहन ट्रॅक्टर ट्रॉली तुन होणारी ऊस वाहतूक फारच धोकादायक निर्माण करणारी दिसत आहे. त्यात एकमेगा मागे असलेल्या ट्रॉलीत जवळपास 12 ते 13 टन ऊस भरला जातो. म्हणजे 22 ते 24 टन ऊस भरून तो एका ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढला जातो विशेष म्हणजे हे प्रमाण आरटीओच्या नियमापेक्षा अधिक आहे. आरटीओ कडून वाहतूक प्रमाणपत्र मिळवून ठरवून दिलेल्या प्रमाणात वाहतूक करायची असते मात्र ते प्रत्यक्षात वाहनचालकांकडून नियमाचे पालन होत नसल्याचे दिसून येत नाही. त्याबरोबर सध्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर असणारे बहुतांशी चालक हे प्रशिक्षण घेतलेले नसतात एवढेच काय त्यांच्याकडे अवजड वाहतूक करण्याचा परवानाही नसल्याचे करणारे ट्रॅक्टर ट्रॉली वाहने सध्या रस्त्यावर दिसू लागली आहेत .