
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
लोहा:- सामाजिक , शैक्षणिक, कामगार , व आंबेडकरी चळवळीत उल्लेखनीय कार्य करणारे भारत वानखेडे प्रणित अनु जाती – जमाती- विजा- भज -इमाव विमाप्र मंत्रालय मुंबई प्रणित जलसंपदा विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा. बी.बी. गायसमुद्रे यांना समाजभूषण पुरस्कारां पाठोपाठ आणखी एक महत्त्वाचा महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.एका आठवड्यात सलग दोन महत्वपूर्ण पुरस्काराने मा. बी बी गायसमुद्रे हे सन्मानित करण्यात आले आहेत.
नांदेड येथील कुसुम सभागृहात त्यांना दि. १८ रोजी समाजभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे तर दि. २६ रोजी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात बी बी गायसमुद्रे यांना महात्मा समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने एका शानदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.