
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी कलंबर सर्कल
हनुमंत श्रीरामे
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे.अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन निर्णय क्रमांक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक एस आर व्ही 2021 प्र/क 61 कार्या /12 दिनांक 17 डिसेंबर 2021 अन्वये शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 पुढे ढकलण्यात आली आहे.अशी माहिती आयोगामार्फत मिळाली आहे.
2) परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.