
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मरखेल
गाडीवान एकनाथ
देगलूर :- देगलूर तालुक्यातील मरखेल सर्कल मध्ये असलेल्या अनेक गावांमध्ये दारू मटका गुटखा जुगार असे अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत असुन त्याच्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे त्यामुळे महिला शालेय विद्यार्थ्यांना खूप ञास होत आहे वेळोवेळी सुचना देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे .विशेष म्हणजे मरखेल सर्कलच्या आजूबाजूला कर्नाटक व तेलंगणा राज्य असल्यामुळे त्याचा फायदा इतर लोक घेत असून सदर बाब चिंताजनक असल्याचे लक्षात घेऊन मरखेल सर्कलचे प्रतिनिधी दैनिक वंचित क्रांतीचे अविनाश भाऊ सोनकांबळे देवापूरकर यांनी तात्काळ मरखेल पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले.