
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षीत गायकवाड
मुखेड :-आंबेडकरी चळवळीत स्वतः ला झोकुन देऊन ५० वर्ष पूर्ण केल्याबद्दल रिपब्लिकन रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १जानेवारी२०२२रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या युद्धाचे सरसेनापती सिद्धनाक महार यांचे बारावे वंशज मिलिंद ईमानदार भीमा कोरेगाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
दलित पँथरच्या मुशीतून घडलेल्या पँथर नेते दशरथराव लोहबंदे यांनी नामांतर लढ्यापासून गायरान जमिनीचे प्रश्न,अन्याय अत्याचार विरोधात आंदोलने केली गेल्या ५ दशकापासून मुखेड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन या ठिकाणी शोषित वंचित लोकांच्या न्याय हक्कासाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झिजणाऱ्या दशरथराव लोहबंदे या एका पँथर लढवयास रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीने रिपब्लिकन रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल जिल्हाभर सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.