
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी:- मौजे धसवाडी ता.अहमदपूर जि. लातूर याठिकाणी श्री दत्त मंदीर परिसरामध्ये बाळू मामा महाराज ह्यांच्या पालखीचे ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र खंडाळी तर्फे कोविड लसीकरण तसेच आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नित्यानंद कुंभार, आरोग्य सेवक परमेश्वर दराडे, आरोग्य सेविका सौ ठाकूर ऐश्वर्या, आशा कार्यकर्त्या सौ. सुरेखा पांचाळ व सौ आम्रपाली कांबळे, अंगणवाडी सेविका श्रीमती अयोध्या कामखेडकर आदी सहभागी होते.आणि गावातील हितचिंतक ,सरपंच, उपसरपंच, सदस्य, पत्रकार सर्व उपस्थिती राहून लसीकरण पार पाडले