
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कौठा सर्कल
एस.डी.बोटेवाड
कंधार :-श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या आमच्या संस्थेचे सन्मानिय सचिव, संस्थापक व संचालक डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून सावली सारखे सोबत राहणारे माजी आमदार, स्वातंत्र्य सैनिक भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांचा आज २८ डिसेंबर २०२१ रोजी ९१ व्या वर्षांत पदार्पण करत वाढदिवस क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार येथील सुलोचना निवासस्थानी साजरा करतांना गोपाळसुत दत्तात्रय एमेकर रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांनी अनोखा उपक्रम करत मक्याच्या कणसावर शे.का.पक्षाच्या कार्यकर्त्यास भाई संबोधल्या जाते.त्या भाई शब्दास सहस्त्रवेळा लिहून बियाणे कणीस प्रतिकात्मक देवून अभिष्टचिंतन केले.मक्याच्या दाणे-दाणे पर भाई शब्द लिहून काचेत फ्रेम करुन श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे अध्यक्ष डाॅ.प्रा.पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यांच्या समर्थ हस्ते प्रदान करून अनोखे अभिष्टचिंतन केले.हा उपक्रम सन्मानिय अध्यक्ष साहेब यांना खुप आवडला.
डाॅ.प्रा.पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी माझ्या उपक्रमाचा उद्देश सांगतांना, काका तुमच्या सारखे प्रामाणिक भाई आता मोजकेच राहिले,म्हणून नविन तुमच्या सारख्या भाईंची आता नव्याने पेरणी करण्यासाठी बीयांचे कणीस तुम्हास वाढदिवसानिमित्त दीर्घायुरारोग्य अभिष्टचिंतन करतांना ही भेट.माझा उपक्रम यशस्वी झाल्याने आनंद वाटला.माझ्या लेखनास व विविध उपक्रमास प्रत्येक वेळी दाद देवून माझा उत्साह वाढविणारे भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब यांनी अभिष्टचिंतन करतांना, उपक्रम राबवल्या बद्दल माझा सत्कार करुन माझ्या जणु उर्जाच भरली.