
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी
शहाबाज मुजावर
पन्हाळा :- पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेवर 31 डिसेंबर पासून राज्य शासनाने प्रशासक नियुक्ती केली असून, प्रशासकपदी मुख्याधिकारी स्वरूप खरगे तसेच इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरूंदवाड, मलकापूर, या नगरपालिकांवर तितल्या मुख्याधिकारी यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. तर गडहिंग्लज, मुरगुड, वडगाव, येथे प्रांताधिकारी तर कागल येथे तहसीलदार यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, आठ नगर परिषद चे मुदत बुधवारी व पन्हाळा ची मुदत गुरुवारी संपणार आहे त्याबाबत सोमवारी उशिरा आदेश काढले आहेत.याबाबत राज्य शासन प्रधान सचिव महेश पाठक यांनी काढलेल्या आदेशात संपूर्ण जगभर पसरलेला साथीचे रोग कोरोनामुळे राज्यात आलेल्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुकाकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने मुदत समाप्तीनंतर संबंधीत स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचा कारभार बुधवारी दि.29 व गुरुवारी.दि30 रोजी प्रशासक कारभार हातात घेणार आहेत.तसेच ओबीसी आरक्षण चा तिडा निर्माण झाल्यामुळे या निवडणूका पुढे जाणार आहेत व संबंधीत स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे.
.