
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :धनुष आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा बहुचर्चित ‘अतरंगी रे’ सिनेमावर वादाच्या भोवऱ्यात, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेता धनुष आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा बहुचर्चित ‘अतरंगी रे’ सिनेमावर वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. गेल्याच आठवड्यात डिझनी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित झालाय.या चित्रपटात एका हिंदू तरुणीची व मुस्लीम तरुणाची प्रेमकहाणी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी या चित्रपटातून लव्ह जिहादचा प्रसार केला जात असल्याचे म्हटले आहे. तसेच या चित्रपटात हिंदूची प्रतिमा मलिन करण्यात आली असल्याने त्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी लावून धरली जात आहे.
24 डिसेंबर रोजी हॉटस्टारवर ‘अंतरंगी रे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात सारा अली खान (रिंकू) हिचे एका मुसलमान जादूगारासोबत प्रेमसंबंध दाखवले आहेत. अक्षय कुमारने या जादूगाराची भूमिका केली आहे. मात्र रिंकूची आई वडिल तिच्या मनाविरूध्द एका तमिळ तरुणाशी (धनुष) तिचे लग्न लावून देतात. लग्नानंतर रिंकू तिच्या पतीसोबत त्याच्या घरी जाते मात्र तिचे प्रेम त्या जादूगारावरच असल्याचे ती तिच्या पतीला सांगते.
जादूगारासोबत लग्न करण्यासाठी ती पतीला सोडायला देखील तयार असते. अशी या सिनेमाची कथा असून त्यात हिंदूना निष्ठूर दाखवण्यात आले आहे. असेही काही युजर्सचे म्हणणे आहे. तसेच यातून लव्ह जिहादचा देखील प्रसार होत असल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे.
‘एक हिंदू तरूणी एका मुसलमानाच्या प्रेमात वेडी होऊन आपल्या नवऱ्यालाच सोडायला तयार होते. या प्रकारामुळे सिनेमा ‘लव जिहाद’ला प्रोत्साहन देत आहे. त्यात प्रभू श्री रामचंद्र व रामायणाचाही अपमान झाल्याचे एका नेटकऱ्याचे म्हणने आहे. त्यामुळे या सिनेमावर हिंदू लोकांनी बहिष्कार घालावा अशी मागणी केली जात आहे.