
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिचा वाढदिवस बदल एक खिसा,अक्षय कुमारसोबत लग्न झालं आणि लग्नानंतर ट्विंकलने अभिनयाला रामराम ठोकला आज ती आपल्या संसारात आनंदी आहे. अभिनयाची कारकिर्द संपली पण लेखिका म्हणून नाव कमावतेय. याच ट्विंकलवर बॉलिवूडच्या एका ‘जानीमानी हस्ती’चं जीवापाड प्रेम होतं. होय,अगदी तिच्यामुळेच त्याने आजपर्यंत लग्न केलं नाही, हेही खरं आहे. आम्ही बोलतोय ते करण जोहरबद्दल
ही गोष्ट अक्षय कुमारलाही माहित होती.’कॉफी विद करण’ या करणच्याच शोमध्ये यावरून अक्षय करणची मस्करी करतानाही दिसला होता.
होय, करण जोहर आणि ट्विंकल लहानपणापासूनचे मित्र. ट्विंकलने करणला मित्रापेक्षा फार काही मानलं नाही. पण करण मात्र ट्विंकलवर अक्षरश: फिदा होता. अगदी तिच्यासोबत लग्न करण्याची त्याची इच्छा होती. खुद्द ट्विंकलने ‘मिस फनीबोन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी करण आणि तिच्या नात्याबद्दल, त्यांच्या मैत्रीबद्दल सांगितलं होतं. करण जोहरला आवडलेली मी एकमेव मुलगी होती. करणने त्याच्या प्रेमाची कबुली देखील दिली होती, असं तिनं सांगितलं होतं. ती म्हणाली होती,’ करण व मी आम्ही दोघेजण एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होतो. करणला खूप भूक लागत असल्याने कँटीनमधून काही तरी खायला घेऊन ये, असं तो सांगायचा आणि मी कँटीनमधून खायचे पदार्थ चोरून आणायचे. करणला बोर्डिंगमध्ये राहायला आवडायचं नाही. एकदा त्यानं बोर्डिंगमधून पळून जाण्याचाही विचार केला होता. त्यावेळी मी त्याला बोर्डिंगच्या मागे असलेल्या डोंगरावरून उडी मार आणि पळून जा असं सांगितलं होतं. खास म्हणजे, मी सांगितलं ते त्यानं केलंही होतं आणि यामुळे सर्वांसमोर त्याला शिक्षाही झाली होती.’
ट्विंकलला सर्वजण टीना या नावानं हाक मारायचे. त्यामुळे करणने ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमा केला तेव्हा त्याने जाणीवपूर्वक एका नायिकेला टीना हे नाव दिलं होतं आणि ही भूमिका ट्विंकलनेच करावी, अशी त्याची भरून इच्छा होती. परंतु ट्विंकल या सिनेमात काम करायला नकार दिल्याने अखेर त्याने ही भूमिका रानी मुखर्जी दिली होती.