
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : कपिल देव यांच्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंहचं अधिक कौतुक झालं.चाहत्यांनी आणि समिक्षकांनी देखील या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला.1983 मध्ये भारताच्या दिग्गज खेळाडूंनी विश्वकप जिंकून इतिहास रचला. हा इतिहास सुंदर कथेच्या रुपात दिग्दर्शक कबीर खानने रुपेरी पडद्यावर मांडला. 83 सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप धुमाकूळ घालेल अशी आशा होती. मात्र तसं झालं नाही.
ओमायक्रॉनचा धोका, हॉलिवूड आणि साऊथच्या सिनेमांचं एकत्र रिलीज होणं. सगळंच 83 सिनेमाकरता भारी पडलं. या 5 कारणांमुळे 83 सिनेमा फार चांगला नाही.सर्वप्रथम 83 च्या पहिल्या आठवड्यातील बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे पाहू. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 83 च्या कमाईनुसार चित्रपटाची कमाई सादर केली. त्यांच्या म्हणण्यानुसार घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी 12.64 कोटी रुपयांनी सिनेमाने ओपनिंग केली. शनिवारी ही कमाई 16.95 कोटी रुपये आणि रविवारी 17.41 कोटी रुपये होती.
मात्र सोमवारी हा आकडा खाली आला. 10 कोटी रुपयांमध्ये हा आकडा दिसला. चौथ्या दिवशी तर ही कमाई अगदी 7.29 कोटी रुपयांवर आली. चार दिवसांत या सिनेमाने 54.29 कोटी रुपयांची कमाई केली आहे.