
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- भागवत कथा श्रवण केल्याचे अनेक फायदे आहेत कथेला आचार संहिता आहे म्हणुन मानवाचा आचार विचार आणि संचार कसा असावा एकमेकांशी सौजन्याने वागावे हे शिकवते माणसाने देवाच्या पाया नाही पडलं तरि चालेल पण समाजात जगत असताना प्रत्येकाशी प्रेमाने वागा हाच खरा परमार्थ आहे असे विचार ह भ प सुनील महाराज आष्टीकर यांनी मांडले कारण हा देह एके दिवशी जाणारच आहे.
कारण अमर कुणीच नाही हे जीवनातील अंतिम सत्य आहे. मग चांगलच वागायला काय हरकत आहे भागवत धर्माचं हेच कार्य आहे माती सांगे कुंभाराला पायी मज तुडवीसी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी शेवटी हा मातीतच जाणार आहे तर मग नर देहाचं सार्थक करा व सत्याचा स्विकार करा भागवत श्रवण केल्याने याची जाणीव होते व मृत्युचं भय दुर होत असे सुविचार महाराजांनी श्रोत्यांना सांगितले.
श्री शिवाजी अंबेकर यांच्या वतीने देऊळगल्ली लोहा येथे भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे व श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा हि विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे