
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- शहरातील भुतेश्वर चौक येथे एका खाजगी बालरुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरला मंगळवारी रात्री १० च्या सुमारास भीषण आग लागली.या घटनेची माहिती मिळताच क्षणी खा.नवनीत राणा घटनास्थळी दाखल झाल्या.बालकांचे रुग्णालय असल्याकारणाने आगीमुळे कुठली जीवित हानी झाली का?या भितीमुळे रुग्णालयापुढे लोकांची मोठया प्रमाणात गर्दी जमली होती;परंतु माहिती प्राप्तीनुसार कुठलीही जिवीत हानी झाली नसल्याचे पुढे आले.
माहितीप्राप्तीनुसार राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत डॉ. सतिश अग्रवाल बालरोगतज्ञ यांचे भुतेश्वर चौक येथे रुग्णालय आहे.या रुग्णलयामद्धे तिसऱ्या माळ्यावर बालकांच्या आरोग्य राक्षणाकरिता NICU (नवजात अतिदक्षता विभाग) युनिट आहे.अश्यातच मंगळवारी रात्री १० वा. रात्रीच्या सुमारास रुग्णालयाच्या तळमजल्यावर स्थित असलेल्या मेडिकल स्टोअरला भीषण आगीने वेढले.आगीचा वेग रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत जावून पोहचला असता NICU मधील एकमेव बालकाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.आग आटोक्यात करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अतोनात परिश्रम घेतले व अग्निशमन दलाच्या सूत्रांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे दिलेल्या माहितीत वर्तविले.