
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड:- श्रीमद्भगवद्गीता पाठांतर स्पर्धेत ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल येथील नववीतील विद्यार्थी सृष्टी बेजगमवार हिस प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. नांदेड येथील कुसुम सभागृहात आयोजित केलेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील चौदा विद्यालयाचा समावेश होता. श्रीमत भगवतगीता जयंती कार्यक्रम आणि ब्रह्मलीन परम पूज्य स्वामी वरदानंद भारती स्मरण सोहळ्याच्या निमित्ताने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . आंतरशालेय पाठांतर स्पर्धेत श्रीमद्भगवद्गीतेच्या पाचवी अध्यायाची निवड करण्यात आली . यावेळी ‘आम्ही वैकुंठवासी’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले . परमपूज्य सच्चिदानंद शेवडे यांची शताब्दी वर्षपूर्ती असल्यामुळे यावेळी अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले अशी माहिती जयंती मंडळाने दिली.
सन 2021 मधील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गत दोन वर्षापासून कोरनाकाळात या स्पर्धा घेण्यात आल्या नसल्याची खंत बोलून दाखवली . संत दासगणू भक्त मंडळ आणि सायन्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘कर्मसंन्यासयोग’ हा भगवद्गीतेतील पाचव्या अध्यायाची निवड स्पर्धेसाठी करण्यात आली. निवडीबद्दल लोहा येथील माजी नगरसेवक नागनाथराव बेजगमवार यांची नात सृष्टी हीने प्रथम पुरस्कार मिळविला आहे .या पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे आहे.
ऑक्सफर्डच्या प्राचार्य अनुराधा मॅडम, माजी नगरसेवक नागनाथ बेजगमवार, उपनगराध्यक्ष शरद पवार, उमेश बेजगमवार, प्रा. जि.के.आढाव, मारोती पाटील तोनचिरे , तिचे अभिनंदन केले आहे.