
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या अंतर्गत लोहा तालुक्यातील पारडी येथे फ्लोउत्पादन रोपवाटिका केंद्र आहे या केंद्रात जवळपास 60 एकर जमीन ही शासनाची आहे या जमिनीतील काही शेती मध्ये विविध फळांचे रोप तयार करण्यात येते काही शेतीत मोसंबी जांब चिकू बोर आंबा आदी फळबाग आहे उर्वरित चाळीस ते पनास एकर जमिनी वर खरीप व रबी हंगामातील पीके घेतली जातात यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च कागदावर दाखवले जाते परंतु उत्पन्न मात्र नाममात्र झाल्याचे नोंद केली जात आहे कार्यालयात हंगामी व रोजनदारी वर कर्मचारी असताना या कार्यालयात कर्तव्यावर अडलेले अधिकारी हे शेतीच्या कामावर गुतेदाराच्या मार्फत मजूर दाखवून त्यांच्या नावे मजुरीचे बिल काढतात फळांच्या विक्रीचे टेंडर न काढता परस्पर विक्री केली जाते शेती माल शासनाकडे चॅनल द्वारे जमा न करता कमी माल जमा करून इतर माल काळ्या बाजारात विक्री केला जात आहे कार्यालय व परिसरातील भंगार परस्पर विक्री केल्या जाते आणि लाखो रुपयांना शासनाला चुना लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा अजब कारभार फ्लोउत्पादन अधिकाऱ्यांनी सुरू केला असून या सर्व कारभाराची चौकशी करून गैरकारभार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.
पारडी येथील फ्लोउत्पादन व रोप वाटिका केंद्रात शासनाच्या मालकीची 60 ते 64 एकर जमीन आहे येथील सर्व कारभार हा जिल्हा कृषी अधिकारी उपविभागीय अधिकारी कृषी यांच्या नेतृत्वाखाली चालत असते या कार्यालयाकडे इमारत आहे तीन चार लोखंडी शेड आहेत दोन विहिरी बोअर आहेत या जमिनीवर सोयाबीन ज्वारी तूर मूग उडीद आदी पीक खरीप हंगामात घेतली जातात तर रबी हंगामात हरबरा गव्हू करडी पिक घेतली जाते या बरोबरच मोसंबी जांब चिकू डाळींब बोर आदी फळबाग आहे काही शेतीत विविध फळांचे रोप तयार केले जाते यासाठी एक अधिकारी हंगामी कर्मचारी रोजदारी चे कर्मचारी कार्यरत असतात असे असले तरी ही या कार्यालयात कार्यरत असणारे अधिकारी हे विश्वासू हंगामी कर्मचाऱ्याला हाताशी धरून जांब मोसंबी अंबा बिर डाळींब आदी फळाची टेंडर न काढता परस्पर विक्री करून आलेला पैसा शासनाकडे जमा न करता परस्पर खपवतात व फळांची नोंद दप्तरी घेत नाहीत यामुळे गैरकारभार करण्यास सोयीस्कर होत आहे या वर्षी वीस बॅग सोयाबीन पेरले होते त्यात 60 किलो चे 92 कटे पोते झाली परंतु केवळ वीस क्विंटल शासनाच्या दप्तरी नोंद करून उर्वरित जवळपास पन्नास क्विंटल परस्पर विक्री केली असल्याची गुप्त माहिती एका विश्वासू खबऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
फ्लोउत्पादन केंद्रात दरवर्षी किती रोप तयार होतात त्यांचे वय किती किती विक्री केली याची पण नोंद नाही रोजदारी मजुरांच्या नावाने दहा लक्ष रुपयांचे बिल गेल्या तीन वर्षात काढण्यात आले आशा सावळ्या कारभाराची माहिती मिळल्यावरून काही जाणकार मंडळी नी या कार्यालयाकडे लक्ष केंद्रित केले असता या अधिकाऱ्यांनी शेती माला सह लोखंडी शेड तोडून तीन टेमो भंगार परस्पर विक्री केला असल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे कार्यालयातून लोखंडी पाईप रबरी पाईप इंगल आदी साहित्य भंगार घेऊन टेमो बाहेर जात असताना त्या टेमोचा पाठलाग करून टेमो पकडला यावरून भंगार विक्तीचा प्रकार उघडकीस आला या संदर्भात उपविभागीय अधिकारी कृषी यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ पथक पाठवून विना परवाना कार्यालयातील भंगार विक्री प्रकरणाची चौकशी केली परंतु अद्याप संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही केली नाही यामुळे यात गौडबंगाल काय आहे याची चौकशी होणे अपेक्षित आहे शासनाच्या शेतीवरील माल व भंगार परस्पर विक्री करून स्वतःची पोळी भाजून घेऊन शासनाला चुना लावणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे