
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- शहरातील कठोरा परिसरात येणाऱ्या पी.आर.पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराची रंगरंगोटी करणाऱ्या मजुरांचा लोखंडी शिडी उचलताना चार जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला असता गाडगे नगर पोलिसांचा ताफा व अग्निशमन दलाचे जवान क्षणाचाही विलंब करता घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक उपचाराकरिता चारही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविले असता डॉक्टरांनी चौघांना मृत घोषित केले.गोकुळ वाघ , प्रशांत शेगोकार , संजय दंतनाईक , व अक्षय सावरकर असे उपचारादरम्यान मृतकांची नावे समोर आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.