
दैनिक चालु वार्ता
दर रविवारी नायगाव मध्ये होते व्यसनमुक्तीचे अभिनव उपक्रम या माध्यमातून हजारो नागरिकांनी दारूला रामराम केला आहे
मंठा -:( मंठा) तालुक्यातील नायगाव येथील स्वातंत्र्यवीर प्रताप नाईक (स्वातंत्र्य सैनिक) बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,औरंगाबाद संचलित जय जगदंबा देवी जनहितार्थ व्यसनमुक्ती सल्ला केंद्र नायगाव,तालुका. मंठा जिल्हा. जालना येथे दर रविवारी व्यसनमुक्ती केंद्र. संस्थेचे अध्यक्ष विजय गोविंद राठोड हे गेल्या सात तें आठ वर्षा पासून चालवत आहे. या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून राठोड हे लोकांना सखोल तीन ते चार तास व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हजारो लोकांनी दारू ला राम राम ठोकुन व्यसनमुक्त झाले आहे . त्यांनी जे नागरिक थर्टी फर्स्टला दारू सेवन करतात त्यां नागरिकांनी दूध सेवन करावे असे आव्हान प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.थर्टी फस्टला दारू पिने ही समाजाला लागलेली एक कीड किंवा घाणेरडी पद्धत कधी तरी रोखली गेली पाहिजे . त्यामुळे त्यांनी हे कार्य हाती घेऊन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो लोकांना दारू सोडायला लावली आहे. त्यांच्या या कामामुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त होण्या पासून वाचले आहे. राठोड यांनी पुढे बोलताना नागरिकांनी दारू, तंबाखू, गुटखा, इतर नशा युक्त पदार्थ सोडण्याचा नवीन वर्षाचा संकल्प केला पाहिजे.असे संकल्प केल्यास व्यसनाला नक्कीच आळा बसेल त्याचप्रमाणे सामाजिक हानी, वाद तंटे, अपघाताचे प्रमाण कमी झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले . व्यसनमुक्तीसाठी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन शिबीर घेणे आणि नागरिकांना दारू सोडायला लावणे असे विविध उपक्रम विजय राठोड यांनी हाती घेतलेले आहेत. त्यांना मंठा भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अविनाश राठोड(उपसरपंच ) डॉ. संजय चव्हाण,सरपंच गजानन फुपाटे, संस्थेचे सदस्य दिनकर राठोड,संजय राठोड,श्याम चव्हाण आणि गावकऱ्यांचे सहकार्य मिळताना दिसत आहे. सर्व स्तरावरून राठोड यांचे अभिनंदन होत आहे.