
दैनिक चालु वार्ता
जिल्हा प्रतिनिधी
नांदेड :-नांदेड शहरातील एक प्रसिद्ध भाग म्हणून फरांदे नगर हा भाग ओळखला जातो .या भागात उच्चभ्रू लोक वस्ती राहते असे मानले जाते परंतु मधल्या काही काळापासून हा भाग कचऱ्याच्या समस्येने ग्रासला आहे. येथे रोज मुख्य हमरस्त्यावर कचऱ्याचे ढीग साठलेले तुम्हाला दिसून येतात.फरांदे नगर हा भाग पावडेवाडी या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात येतो नांदेड महानगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्या सीमेवर फरांदे नगर नावाचे एक मोठे आणि टुमदार लोकवस्तीचे नगर बसले आहे. हा भाग बंगले आणि उच्चभ्रू लोकांच्या वस्तीचा भाग म्हणून नांदेड शहरात ओळखला जातो परंतु पावडेवाडी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आता हा भाग अधिक कचरा मय भाग म्हणून ओळखला जातो.
नांदेड शहरातील सगळ्यात श्रीमंत नगरे या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात येतात ,काही काळातच हा भाग आता महानगरपालिकेत हस्तांतरित होणार आहे असे लोकांकडून सांगितले जाते, परंतु एवढी विकसित ग्रामपंचायत असताना तरी देखील मुख्य अशा फरांदे नगर भागामध्ये तुम्हाला कचऱ्याचे फार मोठे मोठे ढीगदिसून येतात.
याठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था देखील नाही तुम्हाला रस्त्यावरूनच नालीचे पाणी वाहताना सहज दिसून येईल, नांदेड शहर आणि वाडीला जोडणारा रस्ता पूर्णपणे डांबरीकरण झालेला सुद्धा नाहीये मधेच अनेक खड्यानी युक्त रस्ता तुम्हाला पहावयास मिळेल.या भागात कचरा, पाणी, सांडपाणी , लाईट अशा नानाविध समस्या आहेत.याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.या भागात फरांदे नगर फरांदे पार्क आणि एक फार मोठी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. रस्त्यावर दोन्ही बाजुला कचराच कचरा आहे त्या कचऱ्याच्या बाजूला छोटी छोटी डबकी आणि तलाव निर्माण झालेली आहेत, हे सर्व पाणी येथे बारा महिने असते. या गावाकडे जाताना तुम्हाला अनेक समस्या दिसून येतील, जर या समस्यांकडे दुर्लक्ष केले गेले तर नक्कीच येथील लोकांचे हाल अपेष्टा अजून वाढण्याची शक्यता आहे.
या भागात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक अधिकारी राहतात,जाताना-येताना ह्या सर्व गोष्टी पाहतात परंतु सगळे जण जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करीत आहेत. एरवी छोट्या छोट्या गोष्टींवर आवाज उठवणारे लोक आता काबरे शांत आहेत हे कळतच नाही, यामुळे सामान्य नागरिकांचे हाल दिवसेंदिवस वाढतच आहे मध्यवस्तीत साचलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिक देखील आता हैराण झाले आहेत.यामुळे या ग्रामपंचायतीने थोडेतरी लक्ष द्यावे अशी नागरिकांकडून ओरड होत आहे.