
दैनिक चालु वार्ता
पालघर मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
जव्हार :-जव्हार येथील झालेल्या गुन्ह्यातील अजूनही 4 आरोपित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार प्रादेशिक कार्यालयाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्या प्रकरणी तसेच या कार्यालयाचे व्यवस्थापक यांना जातीय वाचक हिणवल्या प्रकरणी जव्हार पोलिस ठाण्यात महामंडळाच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांसह भात गिरणी मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. शासकीय माहिती इतरत्र दिल्याच्या कलमासह या प्रकरणात ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते, परंतु गेल्या दिड महिन्यापासून हे आरोपि फरार होते, परंतु त्या आरोपि पैकी सदानंद राजुरे या आरोपिला जव्हार पोलिसांनी गडचिरोली येथे जाऊन धडक कारवाई करीत जेरबंद केले आहे,आरोपीचे नाव गोपनीय असल्याने माहिती देता येत नसून हा विषय अतिशय गोपनीय ठेवण्यात आला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून हे फरार आरोपि शोधण्यात जव्हार पोलीसानी अनेक युक्त्या वापरल्या होत्या अखेर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दिनांक 28 डिसेंबर रोजी जव्हार पोलिसांनी सापळा रचित त्यातील एका आरोपिला ताब्यात घेतले होते, त्या आरोपीची आरोग्य तपासणी करून ठाणे न्यायालयात हजर केले असल्याची गोपनीय माहिती सूत्रांनी दिली आहे.अजुनही 4 आरोपित फरार असून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचे जव्हार पोलिसांनी सांगितले आहे.