
दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
जळगाव २९- महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून लहुजी ब्रिगेड महीला आघाडी प्रदेशच्या वतीने निवेदन सादर करण्यात येते की,दिनांक २७/१२/२०२१ रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास सौ.रोहीणीताई खडसे-खेवलकर या हळदीचा कार्यक्रम आटोपून कोथळी मुक्ताईनगर दरम्यान घरी परततांना अंधाराचा गैरफायदा घेवुन काही सशस्त्र गुंडांनी त्यांच्या वाहनावर हल्ला चढवुन जीवे ठार मारण्याच्या बेताने हल्ला चढविला असुन अशा हल्लेखोरांना त्वरीत शक्ती विधेयक कायद्याखाली एका प्रतिष्ठित महीलेवर खुनी हल्ला करण्याच्या इराद्याने हल्लेखोरांनी हल्ला करून पसार झालेले असुन या मागे असलेले मास्टरमाईंड कितीही मोठे राजकीय किंवा लोकप्रतिनिधी सारखे व्यक्ती आढल्यास त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करून एका महिलेवर जिवघेणा हल्ला करणाऱ्या शस्त्रधारी गुंडांविरूध गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी.
जळगाव जिल्ह्याच्या महीला नेत्या मा. सौ. रोहीणीताई खडसे- खेवलकर यांच्या पाठीशी लहुजी ब्रिगेड महीला आघाडी महाराष्ट्र खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असुन त्यांच्यावर घडवून आणलेल्या घटनेचा लहुजी ब्रिगेडने तीव्र निषेध व्यक्त करीत असुन दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येवून अटक करण्यात यावी असे लहुजी ब्रिगेड महीला आघाडीच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई अंभोरे, अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा यास्मिन शेख, फिरोजाबी पठान, आदिवासी महिला आघाडीच्या सौ.मालनताई तडवी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सिताबाई देवरे,ज्योतीताई पवार, विमलताई मोरे, शारदा तायडे,विद्या जाधव आदी लहुजी ब्रिगेड महीला आघाडी वतीने निवेदन देण्यात आले आहे.असे संस्थापक अध्यक्ष सुरेशभाऊ अंभोरे यांनी कळविले आहे