
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
जालना दि. 29 :- बुलढाणा व जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या खामगाव-जालना रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्ष पदा खाली बैठक देि 27 डिसेंबर रोजी मुंबई येथे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल महाव्यवस्थापक कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी रेल्वे मार्गाबाबत प्रकल्पात समाविष्ट बाबी सांगितल्या.मार्गाच्या खर्चाबाबत चर्चा झाली या रेल्वेमार्गासाठी 2016 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.केंद्र सरकार आपला हिस्सा देण्यास तयार असून अजून पर्यंत राज्य शासनाने त्यांचा हिस्सा भरण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही.
राज्य शासनाने आपला हिस्सा भरावा यासाठी खामगाव-जालना या रेल्वेमार्गासाठी यासंदर्भात दि. 4 मार्च 2020 रोजी तारांकित प्रश्न क्रमांक 17 09 विधानसभेत उपस्थित करून विषयाला पहिल्यांदाच सभागृहात वाचा फोडली होती. या प्रश्नाच्या उत्तरात या रेल्वे मार्गातील अडचणी दूर करून त्यांच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे विभागा सोबत बैठक घेण्याची ग्वाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती.त्यानुसार दिनांक 9 फेब्रुवारी 2019 रोजी परिवहन मंत्री ना.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती हे सुद्धा बैठकीत सांगितले.
राज्य शासन राज्यातील इतर रेल्वेमार्गासाठी निधी देत आहे, परंतु विदर्भ, मराठवाडा या मागास भागांच्या विकासाकरिता महत्त्वाच्या रेल्वेमार्गासाठी निधी देत नाही.त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची शिष्टमंडळ अर्थमंत्री ना. अजित दादा पवार यांची भेट घेऊन या रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा असा आग्रह धरणार आहे. या बैठकीत बुलढाणा जिल्हा पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे ,खासदार प्रतापराव जाधव ,भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार ऍड. आकाश फुंडकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व त्यांचे तांत्रिक व सर्वेक्षण अधिकारी उपस्थित होते.