
दैनिक चालु वार्ता
म्हसावद सर्कल प्रतिनिधी
सुनिल पाटिल
म्हसावद :- सन १९७२ मध्ये पाडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांती जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली रोजगार हमी योजनांची पायाभरणी वसंतराव नाईक यांनी केली, त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेचे जनक मानले जाते .रोजगार नासलेल्यानी वर्षातील किमान ठराविक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते .
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आणि प्रभावीपणे चालविलेल्या योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षात एक ठराविक दिवस रोजगारासाठी कामे दिली जातात त्याबदल्यातव रोख रक्कम आणि अन्न धान्य आशा स्वरूपात रोजगार दिला जातो याच प्रमाणे शहादा तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत नागझिरी येथे लोकांना रोजगार मिळावा या साठी रोजगार हमी योजनाअंतर्गत कामाची सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. सायनीबाई नाथा भिल , उपसरपंच , श्री रामदास पावरा , माझी उपसरपंच श्री नाथा पिऱ्या भिल ,ग्रामसेवक श्री विरसिंग पावरा , यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री छगन पाच्या भिल , वन विभाग कर्मचारी श्री अमर पावरा , मोहिते सर , अमोल गावित , व शहादा ची पियुष ठाकरे यांची CFP ची पूर्ण टिम व ग्रामपंचायत शिपाई श्री रायला भिल ,श्री सखाराम भिल , तसेच ग्रामस्थ श्री गुलाब पावरा , श्री गणेश नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.