
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट :- एमडीआरटी व शतकवीर असे दुहेरी यश मिळवणारे ते विभागातून एकमेव आहेत. ईस्लापूर सारख्या ग्रामीण भागात काम करताना दिलिप रायफलवार यांनी विमा क्षेत्रातील जागतिक बहुमान पटकावला आहे. त्यांचा लोकल ते ग्लोबल प्रवास थक्क करणारा आहे. अमेरिका येथे होणाऱ्या या संमेलनाचे निकष त्यांनी अवघ्या 6 महीन्यात पूर्ण केले आहेत. एकलव्याची ध्येयनिष्ठा, कठोर परिश्रम आणि नम्र स्वभाव या गुणांच्या आधारे त्यांनी हे यश मिळवले आहे.यासाठी त्यांनी कोविड दरम्यान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून ऑनलाईन विमा ट्रेनिंग पूर्ण केल्या आहेत.
विमेधारकाला त्याच्या गरजेनुसार सल्ला देण्यात त्यांची हातोटी. करोनामुळे आलेली जागरुकता, योग्य सल्ला आणि विनम्र सेवा याचा लाभ झाल्याचे ते सांगतात.आंदबोरी व ईस्लापूर पंचक्रोशीत ते अनेक कार्यात सक्रिय असतात.
एमडीआरटी:मिलियन डॉलर राऊंड टेबल हे संमेलन दरवर्षी अमेरिका येथे होते. 26 ते 29 जून 2022 ला ते बोस्टन (अमेरिका) येथे होईल. जगभरातील टॉप चे विमा सल्लागार यात भाग घेतात.या यशाचे श्रेय ते त्यांचे कुटुंबीय , एल आय सी विमाधारक आणि मार्गदर्शक एसडीएम जोहर साहेब, एम एम राठोडकर सर, रामचंदर सर, बोरकर साहेब व भुरके साहेब यांना देतात. हे उत्तुंग यशात त्यांना त्यांचे विकास अधिकारी सुधाकर मोरे यांची मोलाची साथ लाभली.पैसा मान सम्मान यापेक्षाही ग्राहकाशी निष्ठा व विनम्र सेवा या भावनेने काम करावे असा संदेश त्यांनी इतर विमा प्रतिनिधी ना दिला.त्यांचे यश या भागातील तरुणांना प्रेरणादायी आहे.