
दैनिक चालू वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी
प्रा. अंगद कांबळे
रायगड:- रायगड क्रीड़ा मंडळ र.ज़ी ट्रस्ट खरसई या सेवाभावी म्हणून रायगड जिल्ह्यात अग्रगण्य असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून कला, क्रीड़ा, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक या क्षेत्रात कार्यरत असून गेली 50 वर्षा पेक्षा अधिक काळ सेवा करत असताना गेली 40 वर्ष शैक्षणिक विभागात गरजू व् गरजवंत विद्यार्थी, विद्यार्थिनीना दत्तक ( शैक्षणिक ) मोफत, वहया शालेयउपयोगी साहित्य वितरण करणे, क्रीड़ा स्पर्धा भरवणे व्यायमशाळा उभारून तरुणांना शरीरसंपदा सदृढ़ बनवणे या करीता आधुनिक साहित्य उपलब्ध करुण देणे, ग्रामस्थांच्या सार्वजानिक कार्यात निधी उपलब्ध करुण देणे असे अनेक कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरु आहेत.
Covid 19 महामारी मुळे गेल्या दोन वर्ष शाळाच बंद स्थितित असल्या कारणाने शैक्षणिक कार्य थांबले होते यंदा मात्र शाळा पुन्हा सुरु होताच सन. 2019-20मधील गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार आणि 120 विद्यार्थ्यांना ( मुले, मूली ) विनामूल्य वह्या वितरीत करण्यात आल्या रा. जि. प. शाळा खरसई हि शाळा आदर्श शाळा व्हावी या करीता शाळेच्या हॉल मध्ये रंगमंच ( स्टेज ) असावा असा प्रस्ताव शिक्षण समिती, शिक्षक वृंन्द यांस कडून आला असताना स्टेज उपरोक्त संस्थेच्या वतीने स्वखर्चाने बांधून देण्याचे घोषित करण्यात आले.या कार्यक्रमास संस्थेचे संस्था प्रमुख श्री. चंद्रकांत. का. खोत (कामगार भूषण ) सरपंच श्री निलेशजी मांदाडक़र, जगदीश खोत, सौ. भारती शितकर, सौ दीपाली कांबळे, सौ जयश्री मांदारे (ग्रा. प. सदस्य ) श्री पांडुरंग माळी, महादेव मांदारे, प्रभाकर कांबळे, नरेश काताळकर, संस्थेचे पदाधिकारी, पालक वर्गाच्या उपस्थितीत अत्यंत उल्हासमय वातावरणात हा शैक्षणिक उपक्रम संपन्न झाला.
या वेळी मा. सरपंच निलेशजी मांदाडक़र,यांनी आपली शाळा तालुक्यात, जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आदर्श शाळा गणली जावी या करीता सर्वाणचे सहकार्य अपेक्षित आहे असे आव्हान सर्वाना केले संस्था प्रमुखानी रा.जि.प. शाळा टिकल्या पाहिजे त्यातून दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे आम्ही संस्था कायम शाळेच्या सहकार्यास तयार आहोत असे मनोगत व्यक्तकेले श्री रामचंद्र पयेर, काशीनाथ कोकाटे शिक्षकवृंन्द, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.