
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
नांदेड:- नांदेड तालुक्यातील भायेगाव पाटीपासून भायेगाव किकि रस्त्यात झालेल्या अतिक्रमण काढण्याच्या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्यानंतर वेळेत ती पूर्ण होवून संबंधितावर कारवाई झाली नाही तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर तहसीलदारांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना लेखी पत्र पाठवून चौकशीची डेडलाईन निश्चित केली असून वेळेत कार्यवाही पूर्ण झाली तर त्याची जबाबदारी आपल्यावर असेल, असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.
भायेगाव ता. नांदेड येथील यज्ञकांत मारोती कोल्हे यांनी भायेगाव, किकी, भायेगाव रोडमध्ये असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी 23 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यावर ग्रामपंचायतीच्या ठरावावरून नांदेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी हा रस्ता ग्रामीण मार्ग क्रं. 45 असल्याचे कळविले आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण पाच वर्षापूर्वीचे असल्याचे म्हणणे ग्रामपंचायतीने सादर केले असल्यामुळे अधिनियमातील तरतूदीनुसार ते हटविणे आवश्यक आहे. महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची असल्याने या प्रकरणात चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करावा. चौकशी अहवालास विलंब झाल्यास तक्रारदाराने पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची जबाबदारी बांधकाम विभागावर निश्चित केली जाईल, असे तहसीलदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.