
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :-वंजारी परिवारचे संस्थापक अध्यक्ष | मुख्य संपादक ऍड. बी आर जयभाये व अखिल भारतीय संत भगवानबाबा वंजारी | ओबीसी विकास महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामराव लवारे दादा यांची पंचाहत्तरावी तसेच महासंघाचा मेळावा व सर्व शाखीय वधू वर परिचय मेळावा दि. 01/01/2022 रोजी शनिवारी सकाळी 10:30 वाजता “हॉटेल रामकृष्ण” जालना रोड हॉटेल अन्विता समोर बीड महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आला आहे.वरील आयोजन समाजाचे हीत लक्षात घेऊन राष्ट्रीय, वधू वर परिचय मेळावा व वंजारी ओबीसी विकास महासंघाची “दिनदर्शिका सन 2022” तसेच वंजारी परिवार डिरेक्टरी सन 2022 चे विमोचन महासंघा मार्फत आयोजित केले आहे.
सर्व शाखेतील सकल वंजारी बंजारी समाजाच्या आपल्या सर्व बंधू भगिनींना विनंती कि त्यांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून वरील मेळाव्यचा लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय संत भगवानबाबा ओबीसी | विकास महासंघाचे राष्ट्रीय महासचिव श्री रामराव बिक्कड व महासंघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष विजय कालेवार यांनी केले आहे.या मेळाव्यास पालकांनी वधू वर सह हजर राहून आपल्या पाल्याचा | विवाह वेळेत जमवून कार्य मुक्त व्हावे. सबब मेळाव्या करिता प्रमुख पाहुणे म्हणून समाजाची गगन भरारी पोहचवणारे सामाजिक, राजकीय नेते विविध क्षेत्रातील नामवंत, गुणवंत उद्दौजक संस्था चालक व प्रसिद्ध समाज भूषण व्यक्ती लाभणार आहेत. तरी आपण हेच निमंत्रण समजून आपल्या सह कमीत कमी 5 नातेवाईकाना माहिती देवून सोबत घेवून हजर राहणे. या वेळी अखिल भारतीय संत भगवानबाबा | वंजारी ओबीसी विकास महासंघाची “दिनदर्शिका 2022” व वंजारी परिवार वधू वर परिचय डिरेक्टरी, नवीन वर्षाची “दिनदर्शिकेचे” मान्यवरांच्या हस्ते “विमोचन” होणार आहे.
तरी वंजारी परिवाराच्या सर्व सहकार्यानी, जाहिरातदार , सोयीरे मंडळी व वंजारी ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकार्यांनी व सदस्यांनी बहुसंख्य समाज | बाधवानी, भगिनींनी, सोयीरे मंडळी सह हजर राहणे करिता तमाम वंजारी, बजारी समजास जाहीर विनम आवाहन श्री विजय कालेवार प्रदेश अध्यक्ष यांनी केले या पत्रका मार्फत करण्यात येत आहे.