
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव नित्यात ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या उत्साहाला थोडीशी वेसण घालावी लागणार आहे. त्यामुळे यंदा नव्या वर्षाचे स्वागत कसे करावे, याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे..दरम्यान, ठाकरे सरकारने नवीन वर्षाच्या स्वागत करताना, आनंद व्यक्त करताना, काय काळजी घ्यायला हवी, याबाबत गृह विभागाने एक नियमावली जाहीर केली आहे. तसेच नूतन वर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे, असे आवाहन केले आहे.60 वर्षांवरील नागरिक, तसेच 10 वर्षांखालील मुलांनी आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर जाणे टाळावे.
– 31 डिसेंबरला समुद्र किनारी, बागेत एकाच वेळी गर्दी न करता, सोशल डिस्टन्स पाळावा.. आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
– कोणत्याही प्रकारचे धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नयेत, तसेच मिरवणुका काढू नये.
– नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिक धार्मिक स्थळी जातात. एकाच वेळी गर्दी न करता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.अशी आहे नियमावली..! – नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातच साधेपणाने आनंद साजरा करावा.
– राज्यात 25 डिसेंबरपासून रात्री 9 ते – सकाळी 6 वाजेपर्यंत ‘नाईट कर्फ्यू’ लागू केला असून, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी आहे. त्याचे पालन करावे.
– नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रम बंदिस्त सभागृहात आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत किंवा खुल्या जागेत उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्के मर्यादेत करावेत.
– कार्यक्रमासाठी गर्दी करु नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. कार्यक्रमांचे ठिकाणाचे निर्जंतूकीकरण करावे.