
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी
संतोष मंनधरणे
देगलूर :- दिनांक काल 29/ 12 /2021 रोजी संध्याकाळी सहा वाजता बिलोली तालुक्यातील केसराळी मिंनकी बडूर बामणी सगरोळी बोळेगाव या ठिकाणी जोरदार विजेच्या कडाक्यासहित गारांचा पाऊस या परिसरामध्ये गारपीटी मुळे खूप अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे हाताला आलेलं पीक मातीमोल झालेला आहे तूर हरभरा गहू कर्डी ज्वारी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे पहिल्याच शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला होता त्यानंतर या गारपिटीमुळे तर आता त्याचे कंबरडेच मोडले आहे. तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी अशी या परिसरातील सर्व शेतकऱ्यांची सरकारला विनंती आहे.