
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा उत्तर प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
वर्धा:- दि.28/12/2021 रोज मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील वाई या गावातील लग्नाचे वऱ्हाड उदगीर येथून लग्न समारंभ पार पाडून त्यांच्या गावी परत जात असताना बहाद्दरपुरा येथे त्यांचे वाहन बिघडले.ही बाब श्री.शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे साहेब यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी व-हाडी मंडळची भेट घेऊन जवळपास शंभर लोकांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था लगेच केली.लहान मुलांसाठी दूधाची व्यवस्था पण केली.दुसऱ्या दिवशी पण या सर्व लोकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून सकाळी पुन्हा जेवन देण्यात आले.त्यांची गाडी दुरुस्त झाल्यावर त्यांना सोबत भाऊ डब्बा देऊन या सर्व मंडळींना पाठवुन दिले.व-हाडी मंडळींनी ‘भाऊचा डब्बा’ या उपक्रमाचे कौतुक करत, आम्हाला जी भाऊंनी मदत केली ती आम्ही आयुष्य भर विसरणार नाहीत.भाऊच्या समाजपोयगी कार्याचे त्यांनी कौतुक केले.
सलाम तुमच्या कार्याला , भाऊ !