
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
अगदी लहान गावांपासून ते मोठ्या शहरापर्यंत ३१ डिसेंबर साजरा करण्याची पध्दत रूढ झाली आहे.३१ डिसेंबर म्हणजे खरे तर योग्य विचार करण्याचा दिवस.या दिवशी घडलेल्या घटनांना आठवून चुकलेल्या गोष्टींना तिलांजली देणे,वाईट प्रवृत्तीना हद्दपार करणे आणि येणाऱ्या नूतन वर्षात उत्तम कार्य करण्याचे संकल्प करणे आवश्यक आहे.देशातील मालमत्तेचे,संपत्तीचे रक्षण करणे व संस्कृतीचे जतन करीत मूल्यांची जोपासना करणे,ती प्रत्यक्ष आचरणात आणणे ही देखील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये आहेत.परंतु,नैतिक मूल्ये,जबाबदारीचे आज आपल्यातील स्वार्थीपणामुळे विसरत चाललो आहे.सण साजरे करतांना आनंदाने गाणे म्हणणे अथवा नाचणे ही माणसाची सांस्कृतिक वृत्तीच असते.त्यामुळे गाण्या-नाचण्याला विरोध करण्याचे कारण नाही.परंतू,डी.जे.जोरजोरात वाजविणे,अंमली पदार्थांचे सेवन,मद्यपान,डान्स-पार्ट्या,फटाके फोडणे,सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे,रस्त्यावर दादागिरी करणे व मुलींची छेडछाड असे प्रकार होतांना दिसतात.असे प्रकार होणार नाहीत यासाठी प्रत्येकाकडून संकल्प झाल्यास समाज सुधारण्यास व शांतता राहण्यास मोठी मदत होईल.आणि सध्या कोरोनाचा (ओमिक्रॉन) तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळले पाहिजे.