
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
देशात कोराेनाच्या ओमायक्राॅन विषाणूचा धोका वाढत असल्याने आगामी निवडणुकांबाबत साशंकता व्यक्त होत होती. मात्र, निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका वेळेवरच होणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने कोविड संकटात कशा प्रकारे निवडणुका होतील, याबाबत माहिती दिली..
कशा होणार निवडणुका..?
▪️ दिव्यांग, गंभीर आजारी असलेले किंवा कोविड रुग्णांना घरुनच पोस्टल मतदानाची सुविधा देण्यात येणार. या मतदानासाठी पूर्णपणे पारदर्शकता पाळली जाईल.
▪️ पूर्वी 1500 लोकांसाठी एक बूथ होता. आता 1200 लोकांसाठी एक बूथ पोल असेल. त्यामुळे पोलिंग बूथची संख्या वाढणार.
▪️ राज्यात 4030 आदर्श मतदान केंद्रे तयार करणार..
▪️ महिला सशक्तीकरणासाठी जवळपास 800 मतदान केंद्रांवर पूर्णपणे महिला व्यवस्थापन करणार.
▪️ मतदान ओळखपत्र नसल्यास इतर सरकारी किंवा इतर महत्वाच्या संस्थानी दिलेल्या ओळखपत्र चालेल. त्यात 11 ओळखपत्रांचा समावेश आहे.
▪️ ‘ईव्हीएम’चा वापर केला जाणार. चिन्हासमोरील बटन दाबल्यानंतर तुम्हाला त्या चिन्हाची चिठ्ठी दिसेल.
▪️ सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लोक मतदान करू शकतील.
▪️ सी व्हिजिल अॅपद्वारे निवडणुकीतील अनियमिततेवर लक्ष ठेवण्यात येणार..
▪️ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडणूक लढवण्यापूर्वी वृत्तपत्र आणि टीव्हीद्वारे स्वतःची माहिती द्यावी लागेल.