
दैनिक चालु वार्ता
भूम प्रतिनीधी
नवनाथ यादव
भूम :- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापन दिना निमित्त भव्य टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेचे प्रथम बक्षिस 11000/- रुपये,द्वितीय बक्षिस 7000/-रूपये, तृतीय बक्षीस 4000/-रूपये आहे.या स्पर्धेचे उदघाटन आज भूम तालुका कांँग्रेस अध्यक्ष रूपेश शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जि. काँग्रेस उपाध्यक्ष विलास शाळू, तालुका कांँग्रेस कार्याध्यक्ष अँड.सिराज मोगल, प्रियदर्शनी काँग्रेस जिल्हाध्यक्षा अमृता गाढवे, अल्पसंख्यक भूम तालुका अध्यक्ष समीयोद्दीन काझी, युवक कार्याध्यक्ष दत्ता तांबे, विधानसभा युवक कांँग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद ,युवक कांँग्रेस शहराध्यक्ष राजू साठे,अँड घनश्याम लावंड, प्रभाकर डोंबाळे शंभूराजे देशमुख,सचिन खामकर ,बाबू तोरकड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व खेळाडू उपस्थित होते.