
दैनिक चालु वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
लातूर :- चाकूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली. या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रेवाडीच्या सरपंच सौ सावित्रीबाई दगडू केदार तर शिक्षण परिषदेचे प्रमुख उद्घाटक म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे ,प्रमूख पाहूणे म्हणून जि.प.चे समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, चाकूर पंचायत समितीचे उपसभापती सज्जनकुमार लोणाळे , प्रतिक केदार, डायटचे रमेश माने, डॉक्टर जगन्नाथ कापसे, मुख्याध्यापक दत्तात्रेय नेवाळे ,केंद्रेवाडीचे ग्रामस्थ तसेच केंद्रातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
चाकूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे आयोजित केलेल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत बोलताना लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले की राज्यशासन वा केंद्र शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या निधीची उपलब्धता नसताना लातूर जिल्हा परिषदेच्या विशेष फंडाचा अत्यंत अल्प निधी व जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांनी लोकसहभागातून व स्वखर्चातून जिल्ह्यातील निवडलेल्या 500 पेक्षा जास्त शाळांमध्ये अहोरात्र परिश्रम घेऊन बाला उपक्रमांतर्गत शाळांमधील भौतिकसविधांत अमुलाग्र बदल करत शैक्षणिक दर्जा उंचावण्यात जिल्हा परिषद शाळांना यश प्राप्त झाले आहे बाला उपक्रमाच्या यशस्वीतेचे सारे श्रेय जिल्ह्यातील मुख्याध्यापक व शिक्षकांना जाते असे सांगत आपल्या जिल्ह्यातील बाला उपक्रमाची दखल राज्यातील इतर जिल्हा परिषद घेत असून इतर जिल्हा परिषदेने लातूर जिल्ह्यातील बाला उपक्रमाची पाहणी करण्यासाठी पथक पाठवत आहेत याचा लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मला सार्थ अभिमान असल्याचे श्री राहुल केंद्रे यांनी सांगितले.
लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षकाच्या अनेक प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्यात आम्हाला यश आले असून विस्ताराधिकारी, मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक पदोन्नती, सीएमपी प्रणालीद्वारे वेतन , निवड श्रेणी वेतन श्रेणीचा प्रश्न या जिल्हास्तरावरील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आजतागायत केली असून पुढील काळात ही शिक्षकांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत यासाठी प्रयत्नरत राहू असा शब्द श्री केंद्रे यांनी या प्रसंगी दिला