
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व
प्रतिनिधी मोहन आखाडे
औरंगाबाद:- औरंगाबाद येथे दिनांक २८/१२/२०२१ रोजी केशरबाग लॉन्स मिटमिटा जय आवजीनाथ सेवा संघ महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या उपक्रमा अंतर्गत वर्ष २०२२ च्या दिनदर्शिका चा प्रकाशन सोहळा व समाजातील मान्यवर यशस्वी समाज बांधवांचा सत्कार उपस्थित समाजबांधवांच्या उपस्थितीत अयोजित करण्यांत आला होता छावणी कँन्टोनमेन्टचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री प्रशांत तारगे औरंगाबाद नव नियुक्त भा.ज.पा.संभाजीनगर शहर उपाध्यक्ष ॲड.श्री अरविंद डोनगावकर , यांचा सत्कार जय आवजीनाथ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र करपे, यांचे हस्ते सेवा संघाचे वतीने करण्यात आला..तसेच श्री राजेंद्र गिरधर खांडरे रा औरंगाबाद हे बजाज कंपनी बजाजनगर औरंगाबाद येथुन प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांनाही सेवासंघातर्फे सन्मानित करण्यात आले.
जय आवजीनाथ सेवा संघ हि सामाजिक संस्था प्रत्येक वर्षी सामाजिक माहिती व संदेशासह दिनदर्शिकेची छपाई करुन समाजाला विनामुल्य भेट देण्याचा उपक्रम राबवत आहे तसेच जय आवजीनाथ सेवा संघ या शिवाय अनेक समाजिक उपक्रम राबवित असतात गेल्या दोन महिन्यापुर्वी समाजिक बांधलिकी म्हुणुन एक रुग्णवाहिका औरंगाबाद शहरात समाजाच्या सेवेत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे व सध्या औरंगाबाद शहरात ती वैद्यकीय सेवेत उपलब्ध आहे..याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन वैद्यकीय मदत,विवाहकार्य मार्गदर्शन वधुवर सुचक मार्गदर्शन तसेच वंजारी समाजातील आद्यसंत श्री आवजीनाथ बाबा यांचा संपुर्ण भारतभर प्रचार प्रसार तसेच वंजारी समाज उत्कर्षासाठी सामाजिक संघटन व प्रबोधन या सारखे विविध उपक्रम राबवित आहेत. जय आवजीनाथ सेवासंघाच्या अनेक शहरात शाखा स्थापन करण्यात आलेल्या आहेत या शाखेच्या अंतर्गत अनेक शहरात सेवा संघाचे कार्य चालु आहे