
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र ज्ञान मंडळ पुरस्कृत कॉमटेक कंप्युटर सेंटर,कंधारतर्फे दिनदर्शिका २०२२ चे शासकीय निमशाशकीय कार्यालय,शाळा, आदी प्रतिष्ठननां मोफत वाटप करण्यात आले. नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला. सेंटरचे संचालक मुरलीधर थोटे यांनी या यशस्वी श्रुंखलेचा महत्वाचा भाग असलेल्या कॉमटेक कंप्युटर संस्थेचे कार्य व २१ व्या शतकातील बदलावं आदींची माहिती देत या जमान्यात संगणकाचे महत्व काय आहे व संगणकाच्या ज्ञानाने काय बदलावं होतो या बद्दलची माहिती देत २०२२ चे दिनदर्शिकेचे शहरात वाटप केले.
विशेष म्हणजे हि दिनदर्शिका म्हणजे तारखा,सणवार किंवा पंचाग पाहण्यासाठी मर्यादित नाही,तर २१ व्या शतकातील पुन्हा एक नवीन वर्ष,पुन्हा एक नवीन अशा,तुमच्या कर्तत्वाला पुन्हा एक नवी दिशा,कॉमर्स,आर्टस् विध्यार्थ्यांसाठी इंग्रजी संवाद कौशल्ये सह मी ठरवलंय मला कंप्युटर मास्टर व्हायचंय!, तुमच्या स्वप्नांना मिळेल उंच भरारी,नवीन तत्रंज्ञान नवी दृष्टी…रोबो सोबत करूया गप्पा गोष्टी,तुमच्या करिअरसाठी बेस्ट पर्याय निवडा,तुमचे उज्वल भविष्य हेच आमचे ध्येय,शालेय शिक्षक ते ईस्कुल शिक्षक शैक्षणिक प्रवास…,डिजिटल युगात पुढे जाण्याचा आतमविश्वास…,टर्निग पॉईंट आदी छायाचित्रांद्वारे लोकांपर्यंत पोहचण्याचे कार्य तालुक्यातील कॉमटेक कंप्युटर सेंटर करीत आहे.आपल्या शहरातील व ग्रामीणभागातील विद्यार्थी २०२२ या साली नवीन तत्रंज्ञानांची नवी दृष्टी घेऊन डिजिटल युगात पुढे जाण्याचा आतमविश्वास दिनदर्शिकांच्या माध्यमातून दाखवणारे ठरत आहे.आयुष्याचा वाटा व दिशा देणारे संदेश व शिक्षणाचे महत्व पटवून देत आहेत.या उपक्रमाबद्दल शहरातील विविध कार्यालय,शाळा,खाजगी शिकवणी सह महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केल्या जात आहे.