
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
गोवा :- आयसीएआर-सीसीएआरआय, गोवा विभागाकडून 16 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शेतकऱ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेसंबंधी जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आयसीएआर-सीसीएआरआयचे संचालक डॉ प्रवीण कुमार यांच्या हस्ते स्वच्छता पंधरवड्याचे उद्घाटन करुन उपस्थितांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात आली.
संस्थेने पर्रा, प्रियोळ, करमळी, ओझरी, मोइता या गावांमध्ये गांडूळ खत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जुने गोवा येथे काढलेल्या फेरीत 2000 पेक्षाही अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. यात समाजातील सर्व घटकांचा समावेश होता. संस्थेने स्वच्छता आणि आरोग्य यासंबंधी वेबिनार, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, पर्यावरणपूरक सांडपाणी प्रकल्पाला भेट असे उपक्रम राबवले.