
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे शहर
गुणाजी मोरे
पुणे : महाराष्ट्रात कोरोनाने विस्फोटक रुप धारण केले आहे. राज्यात एकाच दिवसात 2,172 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 75 दिवसांनंतर एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत तर कोरोनाने रेकॉर्ड मोडला आहे. येथे एका दिवसात 1,377 रुग्ण आढळले आहेत. 216 दिवसांनंतर मुंबईत एकाच दिवसात इतके रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 63 टक्के रुग्ण एकट्या मुंबई शहरातील आहे. ही एक गंभीर बाब आहे.
राज्यासह मुंबई पाठोपाठ आता पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात आज तब्बल ४०४ नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक नवी रुग्णसंख्या आज आढळून आली आहे. हि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लवकरच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील सध्याची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १ हजार ६७७ वर पोहोचली आहे.
पुणे शहर कोरोना अपडेट :
आज दिवसभरात पुणे शहरात २३२ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर, दिवसभरात रुग्णांना ८३ डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुणे शहरात कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसला तरी पुण्याबाहेरील एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ९० गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – ५०९५०८.
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – १२१८.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – ४९९१७५.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – ६६००.