
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
ईस्लापूर :- ईस्लापूर येथील दै. लोकमत चे जेष्ठ पत्रकार तथा इस्लापुर ग्राम पंचायत सदस्य नारायण दंतलवाड यांचा ७५ वा वाढदिवस शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मानित करुन साजरा करण्यात आला. इस्लापुर येथील ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , व लोकमत कार्यालय इस्लापुर येथे नारायण दतलवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. शारदा अनिल शिंगारे, ग्रामविकास अधिकारी श्री. शंकर गर्दसवार, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम बोनगीर, चंदू पाकलवाड, राजू आंबटवाड, डॉ. भगवान गंगासागर, युवा नेते अनुप देशमुख, अरविंद जाधव ,पत्रकार गौतम कांबळे , गजानन वानोळे ,परमेश्वर पेशवे, मारोती शेळके , गणेश जयस्वाल रावसाहेब कदम, विशाल भालेराव , दशरथ आंबेकर किरण वानखेडे,प्रमोद जाधव, प्रेम जाधव,व येथील. संत ज्ञानेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकवृंद कर्मचारी उपस्थिती होती