
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
नांदेड : काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वास खुश करण्यासाठी प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी बेताल वक्तव्य करत खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर टीका केली. राजकीय प्रवाहाच्या बाहेर गेलेल्या प्रा.धोंडे यांचा हा केविलवाणा प्रयत्न दिसतो. रेल्वेमार्गाचा प्रश्न लोकसभेत आपण मांडला असे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले पण पालकमंत्र्यांना खूश करण्यासाठी गोल बुडाचा चंबु पुन्हा नको येथे लवडला अशी खरमरीत टीका लोहा पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी केली आहे.
नांदेड -लोहा -लातूर रेल्वे मार्ग आपण मंजूर केला असे कधीही जिल्ह्याचे खा.चिखलीकर म्हणाले नाहीत. तर या मार्गा विषयाचा प्रश्न लोकसभेत आपण मांडला असे ते म्हणाले. शिवाय मेट्रो, बुलेट ट्रेन वरून त्यांनी पालकमंत्र्यांवर टीका करताना उपरोक्त मार्गाच्या पूर्णत्वासाठी राज्य सरकार वाटा उचलत असेल तर स्वागताह आहे असे खा.चिखलीकर साहेबांनी सांगितले.
स्टंटबाजी व राष्ट्रीय नेत्यांचा नेहमीच आव आणणारे प्रा.धोंडे यांनी बाजूला फेकल्या गेल्याचा आणि देगलूरमध्ये आपल्यामुळेच काँग्रेस जिंकल्याचा साक्षात्कार झाला असावा त्यामुळे बेताल बडबड करत फुकटच्या प्रसिद्धी झोतात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला.
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर हे जिल्ह्याचे नेते आहेत. निवडणुकीत प्रा.धोंडे यांचे नेहमीच डिपॉझिट जप्त होते. कोणतीच निवडणूक न जिंकणारे हे राष्ट्रीय नेते दरनिवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाला पाठिंबा देतात. नेहमीच पाठिंब्याचे शिल्पकार असलेल्या प्राध्यापक धोंडे सत्ता असेल तिकडे लवडतात गोल बुडाच्या चंबु सारखे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून एखादी जागा पदरात पाडून घेण्याचा हा खटाटोप आहे.
प्रा.धोंडे यांच्या दलबदलू व डिपॉझिट जप्त झालेल्यांनी खा.चिखलीकर यांच्यावर टीका करताना स्वतःचे अस्तित्व काय ते तपासावे अशी खरमरीत टीका लोहा पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी केली आहे.