
दैनिक चालु वार्ता
लोहारा प्रतिनिधी
महेश गोरे
लोहारा :- लोहारा तालुक्यातील बेंडकाळ या छोट्याशा गावामध्ये चौथीपर्यंत शिक्षणा साठी जिल्हा परिषद ची शाळा आहे. या शाळेमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जीवाचे रान करून विद्यार्थ्यांमध्ये प्रगतीचा आलेख उंचावला आहे.असाच बदल इतरही शाळांनी करून या शाळेचा आदर्श घ्यावा असा पालकांमधून सुर निघताना दिसत आहे. एकीकडे उस्मानाबाद जिल्हा सर्वच बाबतीमध्ये मागासलेला असताना शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर सारख्या शहरामध्ये विद्यार्थी जात आहेत भरमसाठ शैक्षणिक शुल्क आकारुन विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत असताना म्हणावे त्या पद्धतीचे शिक्षण मिळत नाही .
जिल्हा परिषद शाळेत तळमळीने शिकवनारे शिक्षक नसल्यामुळे पालकांमधून जिल्हा परिषद शाळे बाबत अनास्थाच असते मात्र बेंडकाळ येथील जिल्हा परिषद शाळा मात्र याला अपवादच म्हणावी लागेल गेल्या अनेक दिवसापासून ज्ञानार्जनाची केंद्रे बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची पाटी कोरीच राहिली होती त्याही परिस्थितीत फक्त एक महिना मध्ये विद्यार्थ्यांना अक्षर ओळख करून देऊन वाचन लेखन शिकवणे हे काम सोपे नक्कीच नव्हते मात्र एस,पी ढोले सर, एस आर भोसले सर, या दोन शिक्षकांनी येथील जिल्हा परिषद बेंडकाळ शाळेतील विद्यार्थ्यांना अगदी उत्तम प्रकारे शिक्षण देऊन फक्त ड्युटी आहे म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत .यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. असेच शिक्षक प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये तयार झाले तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद उस्मानाबाद शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखायला वेळ लागणार नाही. हे सोनेरी दिवस येण्यासाठी मात्र गरज आहे ती अशाच शिक्षकांची.