
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
नांदेड :-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2020-21 व 2021-22 साठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कागदपत्रे जमा करता विद्यार्थ्यांची महाविद्यालय, कोर्टात गर्दी होत असताना दलालांनी विद्यार्थ्यांची नोटरी साठी आर्थिक पिळवणूक करत आहेत .ही बाब ऍड.शेरे यांच्या लक्षात येताच त्यांनी विद्यार्थ्यांना मोफत नोटरी करुन देण्याचा निर्णय घेतला व दिवसभर असंख्य विद्यार्थ्यांना मोफत नोटरी करुन दिली.बाबासाहेबांनी सुशिक्षित-साधन वर्गाला सांगितलेल्या ‘पे-बैक टू सोसाइटी’ संदेशा नुसार गरीब विध्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविला. तसेच शिल्लक विद्यार्थ्यांनी मोफत नोटरी करुन घ्यावी.असे ऍड. रामदास शेरे यांनी सांगितले.