
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे.
मलकापूर :- दि.31 मलकापूर विधानसभा मतदार संघात दोन तालुके येतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मलकापूर मतदार संघाचे आमदार मा. राजेश एकडे यांच्या संकल्पनेतून सतत दोन वर्षापासून मतदार संघात विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाचा झंजावात सुरू आहे.राज्य शासनाच्या वतीने मलकापूर मतदारसंघात जास्तीत जास्त विकासकामे मंजूर व्हावे यासाठी आमदार राजेश एकडे प्रयत्न करत असून या अनुषंगाने नुसतेच महाराष्ट्र शासनाने पुरवणी अर्थसंकल्पात डिसेंबर 2021 मध्ये मलकापूर मतदारसंघात नांदुरा तालुक्यातील कोकलवाडी ते मेंढीळी व मेंढळी ते जवळा बाजार रस्त्याच्या लांबीची सुधारणा करणे.
रुपये 4 कोटी 50 लक्ष, मलकापूर तालुक्यामधील जांबुळधाबा ते मलकापूर रस्त्याच्या लांबीची सुधारणा करणे रुपये 7 कोटी, नांदुरा तालुक्यामधील दिघी ते वडनेर मधील रस्त्यांवर चार पुलांचे बांधकाम करणे रुपये 2 कोटी 50 लक्ष, नांदुरा तालुक्यामधील अलमपुर ते निमगाव फाटा लांबीची सुधारणा करणे रुपये 3 कोटी 50 लक्ष,मलकापूर तालुक्यामधील चिंचोली फाट्याजवळ पुलांची संरक्षण भिंत व पोच मार्गासह बांधकाम करणे रुपये 90 लक्ष, मलकापूर तालुक्यातील हिंगणा काजी ते मलकापूर रस्त्याची सुधारणा करणे 4कोटी 50 लक्ष, मलकापूर तालुक्यातील हरणखेड ते वळजी माळेगांव रस्त्याची सुधारणा करणे.
रुपये 6 कोटी, मलकापूर तालुक्यामध्ये खामखेड रस्त्याची सुधारणा करणे 70 लाख, मलकापूर तालुक्यामधील शिराढोण ते दाताळा मधील रस्त्यांवर दोन पुलांचे बांधकाम करणे रुपये 3 कोटी 50 लक्ष, नांदुरा तालुक्यामधील निमगाव ते नारखेड रस्त्याची सुधारणा करणे रुपये 6 कोटी,तालुका नांदुरा येथे तलाठी मंडळ अधिकारी कार्यालय व निवासस्थान इमारतीचे बांधकाम करणे रुपये 8 कोटी 96 लक्ष,तालुका मलकापूर येथील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थानांची व 100 आसन क्षमता असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम करणे रुपये 11 कोटी 84 लक्ष, अशी एकूण 61 कोटी 90 लक्ष रुपये विकास कामासाठी मंजूर झाले आहे.