
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे.
नांदुरा व मलकापूर :- दि. 31 नांदुरा व मलकापूर येथील शासकीय मका खरेदी सुरू करावी अशी तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांची मागणी होती. या वर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले आहे.मका उत्पादकांची रास्त मागणी लक्षात घेता आज नांदुरा येथील खरेदी-विक्री संघामार्फत बालाजी जिनिंग व नांदुरा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नांदूरयाच्या वडी गोडाउन मध्ये व मलकापूर (बेलाड) येथे खरेदी विक्री संघ मलकापूर यांच्यावतीने आयोजित शुभारंभ मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश यांच्या हस्ते काटा पूजन करून मका खरेदीचा शुभारंभ झाला.
महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदी चा लाभ घ्यावा अशी भावना यावेळी आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुरा चे मुख्य प्रशासक श्री पदम पाटील ,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान धांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री वसंतराव भोजने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन पाटील, अनिल धनोकार व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.