
दैनिक चालू वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर भिवधानोरा:- गंगापूर भिवधानोरा ता. गंगापूर येथे शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांच्या प्रयत्नातून प्रहार शेतकरी संघटना व ग्रामपंचायत भिवधानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्तिक नेत्र रुग्णालय अहमदनगर यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, अल्पदरात मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिर,माफक दरात चष्मे, ऑपरेशन मेडिकल, जाणे येणेमोफत शिबीर आयोजित करण्यात आले होते.डॉ भाऊसाहेब आदमाणे,समुपदेशक सारिका आदमाणे,मनीषा दळवी यांनी 60 पेशंट ची तपासणी केली.त्यात सात पेशंट मोतीबिंदू ऑपरेशन साठी जाणार आहेत.आणखी कोणी असल्यास नेणार असल्याचे आश्वासन स्वस्तिक नेत्र रुग्णालयकडून देण्यात आले.त्यास भिवधानोरा गळनिंब येथील नागरिकांचाचांगला प्रतिसाद मिळाला आहे.शुभारंभ प्रसंगी मनीष ऍग्रोचे अशोक चव्हाण,सुरेश चव्हाण,दादासाहेब चव्हाण,किरण घोटकर,जगन्नाथ गवारे,संदीप चापे,केदार चव्हाण,अंकुश लांडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.